आरती ओवाळू भावें, श्री काळभैरावाला ||
दिनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ||
देवा, प्रसन्न हो मजला || धृ ||
धन्य तुझा अवतार जागी, या रौद्ररुपधारी |
उग्र भयंकर भव्य मुर्ति, परि भक्तांसी तारी |
काशीक्षेत्री वास तुझा, तू तिथला अधिकार |
तुझिया नामस्मरणे, पळती पिशाच्चादि भारी ||
पळती पिशाच्चादि भारी II आरती .....|| १ ||
उपासकां वरदायक होसी, ऐसी तव कीर्ती |
क्षुद्र जीव मी अपराधांना, माझ्या नच गणती |
क्षमा करावी, कृपा असावी, सदैव मजवरती |
मिलींदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ||
देवा घडो तुझी भक्ती II आरती .... || २ ||
पुण्यभूमी : श्रीक्षेत्र खामुंडी
पुण्यभूमी आहे खामुंडी हे गाव |
तेथे नांदे देव भैरवनाथ ||
तेथील ग्रामवासी बहु भाग्यवान |
उच्चारिता नाव काळभैरवाचे ||
पाठीमागे शोभे मुक्ताई, खंडोबा |
कळस शोभतो सोनियाचा ||
पुण्याई होती त्या घोरपड्यांची |
मंदिर बांधले केली तटबंदी ||
तळीमाजन खोबरे भंडार उधळती |
काळभैरावाची कृपा मजवरती ||
नित्य सेवा घडो काळभैरावाची |
कवण केले बुद्धी सारी भैरवाची ||
जाहिराती
कोठारी ज्वेलर
ही वेब-साइट मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीत अनुवाद करते...
कोठारी ज्वेलर
नवेंबर २००३ च्या शुभारंभापासून आज पर्यंत या साइट चा दर दिवशी हजारो लोकांनी अनुभव
घेतला आहे...
कोठारी ज्वेलर
ही वेब-साइट मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीत अनुवाद करते...
कोठारी ज्वेलर
नवेंबर २००३ च्या शुभारंभापासून आज पर्यंत या साइट चा दर दिवशी हजारो लोकांनी अनुभव
घेतला आहे...
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et ut wisi enim.