ऐतिहासिक सदंर्भ |

पौराणिक वैशिष्ट्य

प्रस्तावना-पौराणिक संदर्भ

श्री काळभैरवनाथ देवस्थान हे श्री क्षेत्र खामुंडी, ता. जुन्नर, जि. पुणे येथील ग्रामदैवत असून श्री क्षेत्र खामुंडी हे गाव सह्याद्रीच्या डोंगर पायथ्यालगत नगर-कल्याण महामार्गावर असून गावाची भैगोलिक परिस्थिती ८० ते ९० % जमीन खडकाळ आहे व १० ते २० % बागायती आहे.परंतु गावातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती मुंबई-पुणे येथे नोकरी व व्यवसायानिमित्त कुटुंबासह गेल्याने आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.परंतु ग्रामदैवतावर अपार श्रद्धा असल्याने बाहेर गावी असून सुद्धा श्री नाथांच्या यात्रा उत्सवात सर्व भाविक भक्त हिरिरी ने भाग घेतात. श्री काळभैरवनाथ देवस्थान हे श्री क्षेत्र खामुंडी येथील ३०० ते ३५० वर्षापूर्वी असून श्री छत्रपति शिवरायांच्या घोरपडे या सरदारास जहागिरी दिलेले गाव असे बोलले जाते. घोरपद्यनिच या सरदारास जहागिरी दिलेले गाव असे बोलले जाते. घोरपद्द्यनिच या मंदिराचा प्रथम जिर्नोद्वार केला. तसे मंदिरावरील शिलालेख आढळून आले असे वडीलधारी मंडळीं सांगत असत. आज श्री काळभैरवनाथ देवस्थान महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्तान आहे. यात्रा - उत्सवामध्ये पंचक्रोशी बरोबरच मुंबई,पुणे, नगर, नाशिक, ठाणे, या जिल्ह्यांतून हजारो भाविक वर्षभर दर्शनासाठी येत असतात. श्री क्षेत्र खामुंडी व पंचक्रोशीतील भाविक तन-मन-धन अर्पण करून भक्तिभावाने सेवा करत असतात. श्री काळभैरवनाथ अतिशय जागृत देवस्थान असून भक्तांच्या सेवेला तत्काळ प्रसन्न होऊन भाविकांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे चैतन्य निर्माण होते. भाविक भक्त नाथांचे चरणी नवस बोलून आपापल्याला अडचणी सोडवितात व नाथांच्या कृपाप्रसादाने सुखाने जीवन जगतात. श्री क्षेत्र खामुंडी येथील श्री काळभैरवनाथांच्या महती विषयी महाराष्ट्रातील भाविक जनतेला अधिक माहिती व्हावी व भाविकांना भक्तीने नाथांचा कृपाप्रसाद मिळावा म्हणून या पुस्तकाचे प्रकाशन करत आहोत.

मंदिर इतिहास

श्री क्षेत्र तालुका जुन्नर, जी. पुणे येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथानचे मंदिर हे ३०० ते ३५० वर्षापूर्वीचे असून श्री काळभैरवनाथ श्री क्षेत्र खामुंडी व पंचक्रोशीतील जनतेचे कुलदैवत आहे. नवसाला पावणारे स्वयंभू मंदिर म्हणून पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. श्री काळभैरवनाथाच्या मंदिराचा कळस २००२ साली ग्रामस्थांनी भाविकांच्या देणगीतून ५१ तोळ्याचा सोन्याचा कळस बनविला. या कळसाचे कलशारोहण करवीरपीठाचे शंकराचार्य जगदगुरु विद्याशंकर भारती यांच्या शुभहस्ते झाले.आजपर्यंत अनेक थोर व्यक्ती साधू महात्म्यांनी दर्शन भेटीचा लाभ घेतला. श्री काळभैरवनाथांना श्री शंकरांनी सांगितले कि , ब्रह्मदेवाचे शिर उडविल्याने ब्राह्म्हतेच पातक घडले आहे. तेव्हा तु हे ब्रह्मदेवाचे मुंडके घेऊन यात्रा कर. ज्याठिकाणी हे मुंडके तुझ्या हातातून गळून पडेल तेथे तुझे ,ब्रह्महतेचे पातक संपेल. हे ऐकून श्री काळभैरवनाथ यात्रा करण्यास निघाले. तीर्थयात्रा करत असताना काशीमध्ये गेल्यानंतर मनकर्णिका गंगाजळी स्नान केल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मशीर गळून पडले व पातक नाहीसे झाले. श्री क्षेत्र खामुंडी येथे गुराख्याच्या वेषात श्री काळभैरवनाथ गुरे चारण्याच्या निमित्ताने प्रकट होते. त्याकाळी श्री क्षेत्र खामुंडी गावातील गुरे चारणाऱ्या गुरख्यांची मुले आपल्या गायी घेऊन गावाच्या उत्तरेला गायी चरण्यासाठी रोज जात. त्या गुराख्यांना आपल्यामध्ये काळी गाई घेऊन एक अनोळखी मुलगा येत असल्याचे लक्षात आले.गुराख्याचे रुपात असणारे श्री काळभैरवनाथ विविध लिला करू लागले. त्यामध्ये गुरख्यांच्या खोड्या काढत, त्यांच्या शिदोऱ्या पळवत. हा प्रकार पाहून .गुराख्यांच्या मुलांनी त्या गुराख्यांना त्या मुलावर लक्ष ठेवण्यास सांगितले. तो कोठून येतो,कोठे जातो याविषयी चौकशी करण्यास सांगितले. गुराख्यांनी चार-पाच दिवस लक्ष ठेवले असता. काळी गाई घेऊन तो अनोळखी गुराखी उत्तरेकडून येत असे व सायंकाळी एका साबारीच्या बेटात गाईसह गुप्त होत असे हे पाहून भयभित झालेल्या गुराखी मुलांनी आपल्या घरी वडिलधारयांना हा प्रकार सांगितला. हा प्रकार वडिलधारयांच्या लक्षात आला. त्यानंतर श्री काळभैरवनाथ गावातील काही लोकांच्या स्वप्नात जाऊन म्हणाले की, "मी या गावामध्येच असून साबारीच्या बेटाखाली माझी स्वयंभू मुर्ती आहे. गावाच्या कल्याणाकरीता मी येथे प्रकट झालो आहे." हि वार्ता संपूर्ण गावामध्ये पसरली व गावातील प्रमुख लोकांनी त्या साबरीचे बेट तोडून तेथे खोदण्यास सुरुवात केली. खोदकाम करत असताना आज जी मुर्ती मंदिरात आहे.ती मुर्ती त्याठिकाणी सापडली.त्यानंतर त्यावेळी ग्रामस्थांनी यथेचित विधी करून त्याचठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली व छोटेशे मंदिर बांधले व नित्यनियमाने लोक पुजा-अर्चा करू लागले. त्यानंतर काही काळाने छत्रपती शिवरायांचे सरदार घोरपडे यांनी या मंदिराचा जिर्णोधार करून मोठे मंदिर बांधले. त्यानंतर जसजसा काळ बदलत गेला. त्या त्या काळातील ग्रामस्थांनी मंदिरामध्ये सुधारणा करून एक भव्य मंदिर उभारले. श्री काळभैरवनाथांच्या कृपाप्रसादाने हजारो लोकांचे दु:ख नाहीसे झाले. नवसाला पावणारे दैवत म्हणून आज हजारो लोक आपले नवस बोलतात व आपल्या जीवनातील अडीअडचनि सोडवतात. याप्रमाणे पंचक्रोशीतील भाविक जनतेचे श्रद्धास्थान असणारे प्रसिद्ध श्री काळभैरवनाथ मंदिर आहे.

श्री काळभैरवनाथ पौराणिक कथा